नोकरी
यावेळी अंगणवाडी सेविकांसाठीही (Anaganwadi Sevika) मोठी घोषणा आणि तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात एकूण 20 हजार रिक्त पदं (Recruitment) भरली जाणार आहेत. त्यासोबतच अंगणावाडी सेविकांसाठी त्यांच्या पगारात / मानधनात मोठी भर करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की 275 रिक्त पदांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरू करण्यात येतील. सावंतवाडी अंगणवाडी भरती २०२३ या भरतीत ४३ अंगणवाडी सेविका, २१७ मदतनीस आणि १५ मिनी अंगणवाडी सेविका पदांची भरती होणार आहे आणि प्रत्येक तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहेत.