मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे कोल्हापुरामध्ये महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीने आधी इशारा पातळी ओलांडली आणि आता ती धोक्याच्या पातळीकडे जाताना दिसते. संभाव्य पूरपरिस्थितीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी दिलीये. पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. थोडक्यात काय, कोल्हापूरमधली परिस्थितीही एकदम अलर्ट असलेली आहे.
आज आपण ये सर्व सिचुएशनची माहिती घेणार आहोत. कोल्हापूरमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्यानं राधानगरी धरण 100 टक्के भरले आणि धरणाचे पाच ऑटोमेटिक दरवाजे उघडण्यात आल्याने नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेले आहेत. ज्या वेळेस हा वृत्त बनवत आहे (27 July 2023 ) वेळेस 7112 क्यूसेक या वेगाने नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं. पंचगंगा नदीची धोका पातळी आहे 43 फुटांची.
म्हणजे (26 July 2023 ) संध्याकाळचे सहा वाजत आलेत जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार राजाराम बंधाराची पाण्याची पातळी ही 40 फूट पाच इंच पर्यंत केलेले आहे. त्यामुळे पंचगंगा धोक्याची पातळी गाठेल, असा अंदाज आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 81 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आणि येणारा काही तासामध्ये कुंभी कासारी तुळशी या धरणातील पाणीसुद्धा या ठिकाणी येईल. त्यामुळे नदीची पातळी 45 पर्यंत वाढेल या हिशोबाने प्रशासन सामोरे जाण्यासाठी सज्ज होताना दिसते. आता पंचगंगा नदी किती फुटावरती वहायला लागली याच्यानंतर कोणता भाग पाण्याखाली जाऊ शकतो हे बघूयात.
43 फुटांवरून जर का नदी वाहू लागली तर सुतारवाडा पाण्याखाली येऊ शकतो.
45 फूट पर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी पोहोचली तर जुना शिये नाका येथून पाणी भरू शकता आणि कदाचित बावडा रस्ता बंद करावा लागू शकतो.
46 फुटापर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी पोहोचली तर रिलायन्स मॉलच्या इथली कुंभार गल्ली कामगार चा कांदा, बटाटा मार्केट, शाहूपुरी.ईदपर्यंत पाणी पोहचू शकत
46 फूट पाच इंच अ इथे जर का पाणी आलं तर विनाश कोर्नर नाईक मळा आणि पोलो ग्राउंड तिथपर्यंत पाणी पोहोचू शकतो.
47 फुटापर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी गेली तर पंचगंगा हॉस्पिटल जामदार क्लब शुक्रवारपेठेची पश्चिम बाजूपर्यंत पाणी पोहोचू शकतो.
47.4 फूट चार इंचापर्यंत जर का पाण्याची पातळी वाढली तर शाहूपुरी कुंभार गल्ली काटेमळा, जाधववाडी आणि बावडा कॅम्पपर्यंत पाणी पोहोचू शकतो.
47.5 फूट.पाच इंचापर्यंत रेणुका मंदिर, गुंजन हॉटेल, रेणुका नगर, रमणमळा, राजहंस प्रिंटिंग, प्रेस ईदपर्यंत पाणी पोहोचू शकतं आणि
51 कोटा पर्यंत जर का पाण्याची पातळी गेली तर मात्र महाराणा प्रताप हाय स्कूल, उत्तरेश्वर गवत मंडई नाका आणि दुधाळी ग्राउंड परिसर इत्पर्यंत पाणी जाऊ शकतो आणि
55 फुटापर्यंत जर का पाण्याची पातळी पोहोचली तर मात्र कलेक्टर ऑफिसपर्यंत पाणी पोहोचू शकतो जे की अगोदर सुद्धा घडलेला आहे आणि त्यामुळेच कदाचित प्रशासनाने कलेक्टर ऑफिस आहे. तिथले सर्व कागदपत्र जी आहेत ती तेथून हलवायला सुरुवात केली आहे. कलेक्टर ऑफिसमधील महत्त्वाची कागदपत्रं योग्य त्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत.
आता या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती कोल्हापुरचे कलेक्टर राहुल रेखावर यांनी जी माहिती दिलेली आहे, त्याच्यानुसार राधानगरी कुंभी तुळशी कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीमध्ये येतात. कोल्हापूर शहरामध्ये या धरणातील पाणी पोहोचण्यासाठी 15 तास लागतात. यामुळे जर का आज दिवसभरामध्ये पाऊस जरी नाही झाला तरी सुद्धां नदीची पाणी पातळी ही साधारणपणे 44 फुटापर्यंत जाऊ शकते. सध्याची जी काही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. यासाठी अलमट्टी धरणाचा काही हाथ नाहीये. कारण की अलमट्टी धरण अजून पूर्णपणे भरलेला नाही त्या ठिकाणी इनफ्लो आहे. 1,41,000 क्युसेक्स इतका आणि विसर्ग आहे 30,000 क्यूसेक्स होता तरीसुद्धा आधीचे अनुभव बघता प्रशासनाने कर्नाटक सरकारसोबत संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे आणि यासोबतच विसर्ग वाढण्याची सुद्धा विनंती केली आहे.
जेणेकरून इकडे कोल्हापूर सांगली या भागांमध्ये पूर परिस्थिती भयावह होणार नाही. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही आहे की आज पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीची पाण्याची पातळी ही स्थिर आहे. पण जर का पावसाने जोर धरला तर महापुराचा धोका उद्भवू शकतो यासोबतच हवामान विभागाकडून दुपारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे 28 – 29 – 30 सुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि 31 तारखेला मात्र त्याने ग्रीन अलर्ट असणार आहे .
म्हणजे काय? आजचा दिवस आणि पुढचे तीन दिवस जे आहेत ते तीन दिवस फार महत्त्वाचे आहेत. या पूरपरिस्थितीसाठी आता यासंदर्भातील अलर्ट जे आहे ते तुम्ही IMD वेबसाइटवर ती पाहू शकता. यासोबतच हेल्पलाइन नंबर सुद्धा दिलेला आहे. 9209269995 या हेल्पलाइनवर ती तुम्ही संपर्क साधू शकता. यासोबतच डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर कोल्हापूरच्या ट्विटर हॅण्डललासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता याच्यावरती कलेक्टर ऑफिसकडून टाइम टू टाइम तुम्हाला योग्य ते अपडेट देण्यात येतील. प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेली आहे की घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट कुणी पाहू नये? कारण कीं त्यानंतर स्थलांतर करणे अवघड होऊ शकतं. निवारागृहामध्ये पुरुष आणि महिला यांची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे. तसंच मुलं शाळेत गेल्यानंतर पालक स्थलांतरित होण्यास तयार होत नाही. त्याच्यामुळे कोल्हापूर शहरातील शाळांनासुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूरकरांनी या अशा परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे.
तरीसुद्धा प्रशासन आणि नागरिक यांचा या परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य हे फार महत्त्वाचे आजचा दिवस आणि पुढचे 23 दिवस हे फार महत्वाचे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, संपर्कात रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित स्थळी रहा. |
जुनी संग्रहित छायाचित्रे :
#KolhapurMahapur #KolhapurMahapur2023 @kolhapur2023Mahapur #punchgnagaMahapur #MaharashtraRainUpdates