शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा सानुग्रह अनुदान जाहीर : मुख्यमंत्री

ताज्या बातम्या » शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा सानुग्रह अनुदान जाहीर : मुख्यमंत्री

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत शेतकर्‍याच्या प्रश्नावरती म्हणाले की,आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं नाहीय ,सध्या होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे ,ही नैसर्गिक आपत्तीचे संकट मागील काही दिवसा पासून राज्यावर आला आहे.

हवामान खात्याकडून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा तडाखा,पावसाचा हाय अलर्टही देण्यात आला आहे . राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्या साठी राज्यातील शेतकरी लॉगमार्च काढले त्याच्या मागण्यासंदर्भा मुख्यमंत्री विधानसभेत असे सांगितले की,शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामा करण्यास जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले माहिती मिळताच शेतकर्‍यांना मदत केली जाणार . मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केले.

कांदा सानुग्रह अनुदान ३५० रुपये दराने

आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Leave a Comment