महाराष्ट्र अर्थमंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 2023 | Maharashtra CM Budget 2023 Scheme update

शेतकरी योजना » महाराष्ट्र अर्थमंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 2023 | Maharashtra CM Budget 2023 Scheme update राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरलेल्या आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजना | शेती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी महासन्मान शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय आराखडा तब्बल ६ हजार ९०० कोटी रुपयांनी वाढवण्यात आला असून गोरगरिबांसाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य लाभार्थी रुग्णाची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरून थेट पाच लाख रुपयावर वाढवण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्यान निधी योजनेला आणखी एक पूरक योजना जोडत नमो शेतकरी महासन्मान निधी फडणवीस यांनी जाहीर केला. ६ हजार रुपये आधीपासूनच केंद्राकडून मिळतात. त्यात राज्याच्या तिजोरीतून आणखी ६ हजार रुपवे दिले जातील आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला बार हजार सुपवे जमा होतील. १ कोटी पंधरा लाख शेतकरी कुटूंबांना या नमो निधीचा थेट फायदा होणार आहे

2023 अशा योजना, अशा तरतुदी …

  • अनुसूचित जाती घटक योजना… १३ हजार ८२० कोटी
  • आदिवासी उपाययोजना… १२ हजार ६६५ कोटी
  • वार्षिक कार्यक्रम आणि प्रस्तावित निधी
  • कृषी आणि संलग्न सेवा… १३ हजार १५८ कोटी ८८ लाख रुपये
  • ग्रामीण विकास… ७ हजार २९५ कोटी ६३ लाख
  • विशेष क्षेत्र कार्यक्रम… ४२५ कोटी ३० लाख
  • पाटबंधारे आणि पूरनियंत्रण… १६ हजार ६९७ कोटी १६ लाख
  • ऊर्जा… १२ हजार ४०५ कोटी २० लाख
  • उद्योग आणि खाण… १ हजार ८५३ कोटी १३ लाख
  • परिवहन… ३१ हजार ८२६ कोटी २८ लाख
  • विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण… ४७२ कोटी ९५ लाख
  • सामान्य आर्थिक सेवा… २ हजार ८३० कोटी ५३ लाख
  • सामाजिक आणि सामूहिक सेवा… ६७ हजार ८५६ कोटी ५० लाख
  • सामान्य सेवा… १२ हजार ३८२ कोटी ४ लाख
  • इतर कार्यक्रम… ४ हजार ७९६ कोटी ४० लाख
  • एकूण वार्षिक योजना… १ लाख ७२ हजार कोटी

शेती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना


– महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी

– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत आता राज्य सरकारची भर
– योजनेचे नाव – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– शेकऱ्याला प्रत्येक वर्षी 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे
– केंद्रा सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रत्येक वर्षी मिळणार आहे
– महाराष्ट्रात 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केवळ आता  फक्त 1 रुपयांत पीक विमा 

–  अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दिलासा; फक्त 1 रुपयात पीक विमा, तर वर्षाला खात्यात १२ हजार
– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेणार
– आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार पूर्ण हप्ता
– महाराष्ट्रात शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या  शेतकर्‍यांना निवारा-भोजन

– कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा
– शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
– जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार

विकास महामंडळाची स्थापना करणार
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज धनगर समाजाला उपलब्ध करून देणार

 

महिलांना एस.टी. तिकिटात ५० टक्के सवलत

महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्याबस प्रवासा  तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करून राज्य सरकारने महिलांना जागतिक महिला दिनाची खास भेट
दिली आहे. यापूर्वी ७५ वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांना एस.टी. बसमध्ये मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. नोकरदार महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक
वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो.  महिलांची शक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा २५ हजार करण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही.

अन्य घोषणा:

  • लेक लाडकी योजनेंतर्गंत मुलगी १८ वर्षांची झाल्यास ७५ हजार रुपये मिळणार
  • अंगणवाडी मदतनिसांना ५ हजार ५०० रुपये मानधन
  • आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ
  • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार
  • मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी; ५० कोटींचा मत्स्यविकास कोष
  • शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे.
  • अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा; शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटींची तरतूद
  • देवेंद्र फडणवीसांकडून ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा, १८ व्या वर्षी मुलींना मिळणार ७५ हजार
  • चार हजार सरकारी वाहने होणार ‘स्क्रॅप’; १ एप्रिलपासून १५ वर्षांपुढील वाहनांना रस्त्यावर बंदी
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील स्मारकासाठी 349 कोटी तर शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 351 कोटी रुपये निधी उपलब्ध होणार

Leave a Comment