शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे कि प्रत्येक शेतकऱ्यांना आता ६ हजार रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा महाराष्ट्र सरकार ने केली आहे.
हि एक नवीन योजना असून या योजनेचे नाव “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” असे आहे. हि योजना महाराष्ट्र सरकार तर्फे आजाहीर करण्यात आली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेंतर्गत आगोदरच 6000 रुपयांचा निधी देत आहे आणि आता महाराष्ट्र सरकार त्यात आणिखी 6000 रुयांची भर घालेल. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्याला आता प्रतिवर्ष 12000 रुपये इतकी रक्कम मिळनार आहे .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना फायदा मिळेल, असा दवा करण्यातयेत आहे. हि योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे
नावावर जमीन आहे तेच शेतकरी अर्ज करू शकतात.जर तुम्ही केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ला जसे ekyc आणि आधार आणि बँक अकाउंट लिंकिंग केले आहे तसे या योजनसे साठी सुद्धा करावे लागतील अजून केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत नाव असणाऱ्यांना डायरेक्ट या योजनेत नाव मिळणार कि या साठी अजून नवीन अर्ज भरावा लागणार हे अजून सरकाने ने स्पष्ट केलेले नाही.
पण सरकार तर्फे GR आल्यावर आम्ही लगेच आमच्या वेबसाइट वर पोस्ट करू.
महाराष्ट्र सरकार घोषणा #MahaBudget Link : 2023 https://www.marathiwakeup.com/maharashtra-budget-2023-cm/
Namo Shetkari Mahasanman Fund Scheme
योजनेचे नाव | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana |
घोषणा | Maharashtra Sarkar Budget 2023 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
आर्थिक निधी | 6,000 रुपये प्रति वर्ष |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2023 |
अर्ज प्रक्रिया | उपलब्ध नाही |
वेबसाइट | Coming Soon |
Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Apply Online
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते
- जमिनीची कागदपत्रे
- शेती तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 अंतर्गत अर्ज कसा करावा?
Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. सरकार तर्फे GR आल्यावर आम्ही लगेच आमच्या वेबसाइट वर पोस्ट करू.