पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही : मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना

शेतकरी योजना » पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही : मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना

आज शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे पीक कर्ज घेण्यासाठीच्या सिबिलच्या अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.

पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही

शेती है प्राथमिक क्षेत्र असल्याने पीक कर्जाचे वाटप करताना बँकांना संबंधित शेतकऱ्यांचे सिबिल स्कोर बघण्याची आवश्यक्यता नसते . याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज मिळणं खूप सोपं होणार आहे.

As agriculture is the primary sector, banks do not need to look at the CIBIL scores of the concerned farmers while disbursing crop loans. Now Chief Minister Eknath Shinde gave an explanation about this, the farmers have got relief. This government decision will make it very easy for farmers to get crop loans for agriculture.

काही बँकांनी पीक कर्जाचे वाटप करताना संबंधित शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर पाहून कर्ज नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत, नाबार्डकडेही तक्रारी गेल्या होत्या. वास्तविक शेती हे प्राथमिक क्षेत्र असल्याने त्यांना पीक कर्ज वाटप करणे बँकांना बंधनकारक आहे. पीक कर्ज देताना सिबिल स्कोर बघण्याची गरजच नसते. केवळ संबंधित शेतकऱ्याचे इतर वित्तीय संस्थेत पीक कर्ज थकीत आहे की नाही याची माहिती घ्यायची आहे.

थकबाकीदार असेल तर, त्याला वित्तपुरवठा करता येत नाही. याबाबत, मुख्यमंत्री शिंदे यांनी नाबाईड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पीक कर्जासाठी सिबिलची अट लावता
येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकरी पीक कर्ज ( Crop Loan ) घेऊन त्या कर्जातून शेतात पेरणी करतो आणि या पिकातून आलेल्या पैशांतुन ते पिक कर्जाची परतफेड करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या संपूर्ण पिकाला बँकेत पूर्ण तारण ठेवलेलं असत. यामुळे पीक कर्जाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गॅरंटी द्यावी लागत नाही तरी देखील बॅंका शेतकऱ्याचे सिबिल स्कोर पाहूनच त्यांना कर्ज देत असतात. आणि जर पिक चांगले आलेच नाही तर कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिबिल स्कोर कमी अथवा खराब होते आणि त्यांना पुढील बँकेतून कर्ज मिळण्यासाठी अडचणी होतात परंतु आता या निर्णयांना मुले सिबिल स्कोर (Cibil Score) मधून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे.

सीबिल म्हणजे नेमकं काय ? 

सीबिल स्कोर हे एक गणना पद्धती आहे जो व्यक्तीच्या वित्तीय क्रियाकलापांच्या आधारावर असते. सीबिल स्कोर व्यक्तीच्या कर्जाची भरपाई किंवा भुगतानाची क्षमता मोजण्यासाठी वापरले जाते. सीबिल स्कोर 300 ते 900 या वेळापर्यंत असतो, जेथे 900 स्कोर चांगला मानला जातो आणि 300 स्कोर कमी मानला जातो. बँक, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये हा स्कोर आपल्या ग्राहकांची वित्तीय स्थिती जाणून घेण्यासाठी वापरला जातो.

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल ची अट बंद करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या शेत मालाला जोपर्यन्त चांगला हमी भाव आणि किंमत बाजारात मिळणार नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही भलं होईल असं काही शेतकऱ्यांना वाटत नाही.

1 thought on “पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही : मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना”

  1. शेतकरी मित्राना,सिबिल स्कोर मधून दिलासा मिळाला आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबाचे मनापासून आभार.

    Reply

Leave a Comment