विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात गारपीट होणार असल्याचे तर्क हवामान खाते ने दिला आहे तर बीड, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त होणार असल्याचे तर्क दिले आहे. महाराष्ट्राला आणखी दोन – चार दिवस अवकाळी पावसाचा धोका असल्याने पुण्यासह 18 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ Yellow Alert जाहीर केला आहे .
या जिल्ह्यात येलो अलर्ट
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, नंदूरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बीड,सोलापूर, धाराशिव
महाराष्ट्र राज्यात अवकाळीचा पावसाचा दणका सुरूच असून मराठवाडा आणि विदर्भ च्या काही भागात आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरूच राहणार आहे.
मध्य – महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तबला आहे.
शेतकरी whatsapp ग्रुप जॉईन करा
इथे क्लिक करा Join Group Click Here
सरकारी योजना whatsapp ग्रुप जॉईन करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवका पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुकयातील हळदीचे नेरूर दुकानवाड पंचक्रोशीला एक तासाहून अधिक वेळ अवकाळी पावसाच्या गारपिटीने झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या मांगरांची कौले व पत्रे उडून गेले. काही. ठिकाणी आंबा, काजू, सुपारी झाडे मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
केरळ ते मध्य महाराष्ट्र ओलांडून कर्नाटक राज्यात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे; बांगलादेशच्या उत्तर-पूर्व भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीचा प्रभाव वाढत आहे. यासोबतच पश्चिम राजस्थान भागात चक्रीय स्थितीही कार्यरत आहे. या सर्व परिस्थितीमुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता वाढली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात अशीच परिस्थिती आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती 10 पर्यंत कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.